Pages

11 May, 2010

आवडता पक्षी बदक

बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!
आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!
..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..
गांधीजी मोट्ठे नेते होते!!..पण त्यांच्या हातात काठी पण असते!!..
काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते!!..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहे!!.
बदक वाकड्या पायाने चालते..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो! (सुलेखाताइने मला काठीने मारले!!)..
बदक काठीने मारत नाही!!..गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला...
आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात!!..(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते!!)..
आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात...खिडकीपाशी कावळे पण येतात..!!पण बदक येत नाही!!
..कारण ते उंच उडू शकत नाही!!..(आम्ही १ st floor ला राहतो)...पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते!! ..
मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते!!..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतो!!बदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते ...
( पण काळे बदक सुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाही!!)...
मला बदक खुप आवडते

ठळक सूचना -

1. अनोळखी व्यक्तींकडे बघून  हसणे..
2. हॉटेलातले ग्लास घरी उचलून आणणे..
3. प्रेमी युगालांच्या खोड्या काढणे..(जास्तकरून Z ब्रिजवर)
4. मंदिरात बिन चपलीच जाने, आणि नवी कोरी चप्पल    घालून येणे..
5. बारीक पोरांचं chocolate खाणे आणि कावुनी नेलं म्हणून रडवणे.. 
6. सकाळी सकाळी लोकांच्या दारातला पेपर गुपचूप उचलून आणणे..
 7. येणाऱ्या जाणाऱ्या पोरींनाच लिफ्टसाठी हात करणे...
8. मिस कॉल देण्यासाठी पण लोकाचा फोन वापरणे...
9. मोठ्ठ्या हॉटेलात जाने आणि फक्त पाणी पिवून माघारी येणे..
10. बारक्या पोरांना ice-cream दाखवणे आणि रडायला लावणे..
11. कॉईन बॉक्सवाल्याकडे रुपया..आठण्याच्या उधाऱ्या ठेवणे...
12. परीक्षेत चिठ्ठ्या चपात्या ठेवण्यासाठी पूर्वपरवानगी मागणे   (आणि तेही अर्ज करून)..
13. बसल्या बसल्या मधूनच जोरात ओरडणे..
14. शेजार्यांची आलेली पत्रे वाचणे, दाराला बाहेरून कडी लावणे..



ठळक सूचना -
वरीलप्रमाणे वर्णनाचा कोणी आढळल्यास घाबरून जाऊ नये..
त्याला पकडून आमच्या ताब्यात द्यावे अथवा आवरत नसल्यास आमच्या Toll Free नंबर वर कळवावे..
तोच आमचा मंडळाचा "वाढीव कार्यकर्ता"...